दिव्यांगची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय
कर्णबधिरत्व व त्यांचे वर्गीकरण
कर्णबधिरत्व म्हणजे काय ?
कर्णबधिरत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचे दुस-याशी बोलणे व वातावरणातील इतर
ध्वनी ऐकण्याविषयी अक्षमता. कर्णबधिरत्व कानातील एखाद्या भागाला इजा
झाल्याने किंवा एखाद्या रोगामुळे कानाच्या अनैसर्गिक विकासामुळे, जन्माआधी
किंवा जन्मानंतर आलेले असते. कर्णबधिरत्वामुळे ऐकण्याच्या क्षमतेला मर्यादा
पडतातच पण त्याचबरोबर बोलण्यातही दोष निर्माण होतात. भाषा विकासही खुंटतो.
श्रवणदोषाची अनुवंशिक व परिस्थितीजन्य ही दोन मुख्य कारणे आहेत.
श्रवणदोष व त्याचे वर्गीकरण
अ.क्र. डेसिबल श्रवणदोष
( १) ० ते २५ डी. बी. सामान्य श्रवण (श्रवणदोष नाही)
( २) २६ ते ४० डी. बी. सौम्य श्रवणदोष
( ३) ४१ ते ५५ डी. बी. मध्यम श्रवणदोष
(४) ५६ ते ७० डी. बी. मध्यम ते तीव्र श्रवणदोष
(५) ७१ ते ९० डी. बी. तीव्र श्रवणदोष
( ६) ९१ डी. बी. च्या पुढे अति तीव्र श्रवणदोष
कर्णबधिर प्रतिबंधक उपाययोजना
१. मुलाला कानात काडी, पेन्सील, पीन, खडू असे काही घालू देऊ नये.
२. साचलेल्या पाण्याने आंघोळ घालू नये.
३. साधे पडसे, कान दुखणे किंवा वाहणे यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरील उपचार करुन घ्यावेत.
४. कान वाहणा-या व्यक्तीचे कपडे इतरांनी वापरू नयेत, कपडे रोज उकळलेल्या पाण्याने धुवावेत.
६. जवळच्या नात्यात विवाह करु नये.
७. ध्वनी प्रदुषण असल्यास कानाला संरक्षण घ्यावे.
८. गरोदर स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.
९.
गरोदर स्त्रियांनी स्वतःची काळजी घ्यावी. कानाला थंडी लागू देवू नये,
पाण्यात भीजू नये, तसेच ताजे व सकस अन्न व उकळलेले पाणी प्यावे.
१०. मातांनी व मुलांनी रोग प्रतिबंधक लसी द्याव्यात.
कर्णबधिर मुलांच्या विकासासाठी पालकांनी घ्यावयाची काळजी
१. मुलाला श्रवण सहाय्यक उपकरण वापरायला उत्तेजन द्या.
२. मुलाशी त्याला आवड असेल अशा गोष्टीबद्दल बोला आणि त्याला शाब्दिक प्रतिसाद द्यायला उत्तेजन द्या.
३. पालकांनी कुटूंबातील इतरांना कर्णबधिर मुलांशी बोलायला व त्याचे हावभाव समजून द्यायला उत्तेजन द्या.
४. सारख्या वयाच्या मुलांच्या बोलण्याशी आपल्या कर्णबधिर मुलाची तुलना करु नका.
५. कर्णबधिर मुलाला सामान्य मुलासारखे वागवावे. कारण एक कर्णबधिरत्व सोडले तर इतर बाबतीत ते मूल सामान्य असते.
६. कर्णबधिर हा शाप नाही. प्रतिबंध करता येईल असा एक अपघातच आहे.
७. गावातील सामान्य मुले ज्या शाळेत शिक्षण घेतात, त्याच शाळेत कर्णबधिर मूल शिक्षण घेऊ शकते.
८. शाळेत कर्णबधिर मुलाला पहिल्या रांगेत बसवायला सांगावे, शिक्षकांनी त्याच्यावर अधिक लक्ष द्यावे.
९. आपल्या शेजारील गावात अथवा शहरात विशेष शाळेची सोय असल्यास मुलाला विशेष शाळेत पाठवावे.
१०. शैक्षणिक शिष्यवृत्त्यांची माहिती करुन घ्यावी.
११.
शक्य तितके वाकून मुलाच्या पातळीवर या मुलापासून १ मीटर अंतरावरचे बोलणे
सर्वात जास्त चांगले ऐकू येते. कधी कधी मुलाच्या कानात बोलावे. डोळ्याला
डोळे भिडवून प्रत्यक्ष मुलाकडे पाहून बोलावे.
१२. मुलाशी संपर्क साधतांना आजूबाजूला कमीतकमी आवाज असावा.
१३. कर्णबधिर मुलाला शक्यतो एकच, प्रादेशिक किंवा राष्ट्रीय भाषा शिकवावी म्हणजे उच्च शिक्षणाचा वाव अधिक मिळतो.
१४. विशेष शिक्षणाची सोय नसेल तर मुलाला नर्सरी / बालवाडी / अंगणवाडीत पाठवावे.
मतिमंद बालक जन्माला येऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने घ्यावयाची काळजी
१. नियमित डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन घेणे.
२. समतेल (पोषक) आहार घेणे.
३. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.
४. पहिल्या तीन ते चार महिण्यात क्ष किरण तपासणी टाळावी.
५. धनुर्वाताची लस टोचणे अत्यंत आवश्यक आहे.
६. उंच स्टूलवर किंवा खुर्चीवर चढू नये तसेच जड सामान उचलू नये.
७. प्रसुती नंतर बाळ निळे पडले असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा व ऑक्सीजनची व्यवस्था पाहावी.
९. बाळ त्वरीत न रडल्यास डॉक्टरांची त्वरीत मदत घ्यावी.
१०. प्रसुतीनंतर बाळाचे लसीकरण करावे. (पोलिओ, गोवर, धनुर्वात)
११. बाळाला ताप आल्यास डॉक्टरांस दाखवावे.
१२. वारंवार फिट / मिरगी येत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
१३. स्वच्छ उकळुन केलेले पाणी बाळाला पाजावे.
अंधत्वाची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय
१. शुष्कडोळे, खुप-या, गोवर, मेंदूची हानी, व डोळ्यांना इजा इत्यादी मुळे अंधत्व येऊ शकते. अंधत्व जन्मतःही असू शकते.
२. अंधत्वाला प्रतिबंध करण्यासाठी अ जीवनलत्व युक्त आहार घेणे आवश्यक आहे.
(
अ जीवनसत्व युक्त अन्नपदार्थ – पालेभाज्या, पिवळी व तांबडी फळे, उदा.
पालक, गाजर, पपई, तसेच दूध, मांस आणि अंडी तसेच मातेने पहिली २ वर्षे
मुलाला अंगावर पाजणे अत्यंत आवश्यक आहे. )
३. स्वच्छ पाण्याने डोळे वारंवार धुवून स्वच्छ ठेवावेत. घाण फाण्यात पोहू नये. डोळ्याचे माशांपासून रक्षण करावे.
४. खुप-या आलेल्या रुग्णावर त्वरीत इलाज करा. खुप-या संसर्गजन्य असतात आणि स्पर्श व माशांपासून पसरतात.
५. अणकुचीदार अवजारे, फटाके, टोकदार वस्तू किंवा ऍसीड मुलांपासून लांब ठेवावे.
Nice👌👌job,
ReplyDeleteThanks
DeleteThanks
ReplyDelete